एकदा असाच स्वामींचा भेटीचा संदेश येताच, मी, स्वामींना घेऊन येतो, असे म्हणून नाना त्वरित घराबाहेर पडले. ‘डोंबिवली स्टेशनवर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर मी तुझी वाट पहातोय’. असा संदेश होता. नानांना विडी प्यायची सवय आहे. नाना विडी ओढतओढत प्लॅटफॉर्मवर पोहोचले. प्लॅटफॉर्म तुडुंब भरला होता. एवढया गर्दीत स्वामींना कसे शोधायचे असा विचार करीत असतानाच अचानक विचार करीत असतानाच अचानक नानांच्या पाठीवर थाप पडली. नाना दचकले. विडी पटकन टावूâन दिली. स्वामी म्हणाले, ‘कशाला टाकलीस विडी?’ माझ्यापासून काय लपवतोस ? ‘मला सुध्दा दे’ त्याबरोबर नानांनी स्टॉलवरून सिगरेट खरेदी केली आणि स्वामींना दिली…

Leave a Reply