आरती ओवाळू श्री सद्गुरू स्वामी समर्था ।
स्वरूप दिगंबर अजानुबाहू भव्यकायनाथा – दिव्यकायनाथा ।।धृ।।
हृदय निरांजनी शुद्ध प्रेमघृती, भावांच्या वाती ।
भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती ।।१।।
सर्वस्वार्पण नैवेद्याशी ठेविलेचि पुढती ।
सन्मति, सद्धृति सतकृति सद्गति प्रसाद द्या हाती ।।२।।