जय जय सद्‌गुरू स्वामी समर्था आरती करू गुरूवर्या रे ।
अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे ।।धृ।।

अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ।
लीला पाशे बध्द करुनिया, तोडीले भवभया रे ।।१।।

यवने पुशिले “स्वामि कहाँ हैं”, अक्कलकोटी पहा रे ।
समाधिसुख ते भोगुनी बोले, “धन्य स्वामीवर्या रे” ।।२।।

जाणसि मनिचे सर्व समर्था विनवू किती भवहरा रे ।
इतुके देई दीनदयाळा नच तव पद अंतरा रे ।।३।।

Leave a Reply