ह.भ.ब्र.भू.प.पू. विठ्ठल शंकर तथा नाना वालावलकर यांना डोंबिवलीत असताना मोरे दादांचे मार्गदर्शन लाभले. लहानपणापासूनच स्वामीस्वरूपी विलीन असलेल्या सद्गुरू नानांचा अध्यत्मिक मार्ग श्री मोरेदादांच्या मार्गदर्शनामुळे अधिक उन्नत झाला. श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेने व श्री मोरेदादांच्या मार्गदर्शनानुसार प.पू. नानांनी आयुष्यभर अनेक पिडीतांना मार्गदर्शन केले व स्वामी सेवेच्या अविरत प्रवाहात सामील करून घेतले. संस्थारूपाने हेच कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प.पू. नाना वालावलकर व सेवेक-यांनी “सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था, डोंबिवली” या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. श्री स्वामी समर्थांच्या अखंड कृपेने सद्गुरू नानांचे विनामूल्य मार्गदर्शन व सेवेकरी घडवण्याचे कार्य आजही सखाराम कॉम्प्लेक्स स्थित मठात अविरत चालू आहे.

प.पू.मोरेदादांच्यावर नाना-नानींची अपार निष्ठा होती. आजही नाना हे माझे प्रथम गुरु म्हणून आदराने प.पू.मोरेदादांच्या फोटोकडे बोट दाखवतात. प.पू.मोरेदादांनी सांगितलेले वार्षिक उत्त्सव श्रावणात शंकराची सेवा, होमहवन, पूजापाठ, आजही सुरु आहेत. त्या ऊत्सवांचे वार्षीक वेळापत्रक खालील प्रमाणे :

 • गुढी पाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा
 • श्री स्वामी जयंती : चैत्र शुद्ध द्वितीया
 • ब्र. प. पू. श्री मोरेदादा जयंती : वैशाख कृष्ण दशमी
 • श्री गुरु पौर्णिमा : आषाढ पौर्णिमा
 • श्रावण महिना विशेष सेवा : श्रावण शु. १ ते श्रावण कृ. ३०
 • पिठोरी अमावस्या : श्रावण अमावस्या
 • नवरात्रौत्सव : अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी
 • श्री गायत्री माता उत्सव : अश्विन शुद्ध नवमी
 • श्री काळभैरव जयंती : कार्तिक कृष्ण सप्तमी
 • नामसप्ताह : कार्तिक कृष्ण चतुर्दशी ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
 • श्री दत्तात्रेय जयंती : मार्गशीर्ष पौर्णिमा
 • महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशी
 • मांदियाळी : महाशिवरात्रीच्या जवळचा रविवार

विवीध ऊत्सव झाल्यावर त्यांची क्षणचित्रे व अनुभव सदरील वेबासाइटवर कार्यक्रम व अनुभव सदरात प्रसिद्ध करण्यात येतात..