खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ आहेत. श्री स्वामी समर्थ व श्रीपाद श्री वल्लभ यांनी ब्र.भू.प.पू. श्री. पिठले महाराज यांच्या कडून अनेक दीर्घ उपासना करवून घेऊन त्यांचे जीवन श्री. स्वामी समर्थमय बनविले. ब्र.भू.प.पू. श्री. मोरेदादा यांना या सेवा मार्गाच्या संस्थापनार्थ तयार केले.

गांजलेल्या समाजाची संकटे , व्याधी , पीडा , निवारण करून त्यांना प.पू. मोरे दादांनी मानसिक स्थैर्य मिळवून दिले आहे. अध्यात्मिक प्रगतीमध्येच खुंटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची अध्यात्मिक प्रगती सुकर करून दिली. अशा तऱ्हेने त्यांनी सामाजिक , अर्थी , भौतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात प्रभावी कार्य केले. समाजात धैर्य , उत्साह , नवंचैतन्य आत्मशक्ती वाढवून तेज निर्माण केले. कार्यप्रवृत्त केले. हेच कार्य विठ्ठल प.पू. विठ्ठल शंकर तथा नाना वालावलकर यांनी गेली १६ वर्षे अविरत परिश्रम घेऊन अखंड चालू ठेवले आहे.

संस्थारूपाने हेच कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प.पू. नाना वालावलकर व इतरांनी ” सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था , डोंबिवली ” या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे.

संस्थेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत

  1. विनामूल्य उपासना मार्गदर्शन करणे – दुःखी , पिडीत व्यक्तींना विनामूल्य उपासना देणे.
  2. समाजात सामुद:यिकसेवेची सहकार्याची निर्मिती व वाढ करून ही संस्था म्हणजे एक विशाल कुटुंबच आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात रुजविणे. संस्कृती , देशभक्ती याची जोपासना करणे. (सर्व जाती व सर्व धर्माच्या समाजासाठी हि संस्था खुली आहे.)
  3. मांदियाळी , श्री स्वामी समर्थ जयंती , गुरुपौर्णिमा , श्री दत्त जयंती , पिठोरी अमावस्या , महाशिवरात्र इत्यादी धार्मिक कार्यक्रम राबविणे.
  4. बाल संस्कार केंद्र – ५ ते १२ वयोगटातील मुलामुलींना आपल्या संस्कृती बद्दल ज्ञान देणे. शारीरिक , मानसिक , इतिहास इ. विषयांबाबत माहिती देणे. शारीरिक , मानसिक वृढीसाठी मुलांवर संस्कार करणे त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम वाढीस लागावे यासाठी प्रयत्न करणे.
  5. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देणे.
  6. समाजात आरोग्य विषयक ज्ञानाचा प्रसार करणे. वेळप्रसंगी वैद्यकीय सोयी (दवाखाना , हॉस्पिटल) इत्यादी उपलब्ध करून देणे.
  7. पाणी वापर , नियोजन , वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन यासंबंधी लोकांमध्ये जागृती करणे.
  8. मानव धर्माच्या तत्वज्ञानाच्या , वैदिक परंपरांचा परितोष घडविण्यासाठी मंदिरे , संस्कार केंद्रे निर्माण करणे.
  9. संख्याशास्त्र , रेखाशास्त्र , ज्योतिषशास्त्र , वास्तुशास्त्र , आयुर्वेद इत्यादी विविध शास्त्रांची ओळख करून देऊन , संबंधित वाड.मयउपलब्ध करून देणे. त्यासाठी वाचनालय सेवा उपलब्ध करणे.
  10. आपद्ग्रस्त जनतेस मदत करणे.