एकदा सेकंड शिफ्टसाठी नाना डोंबिवलीहून ठाण्याला निघाले होते. दिवा स्टेशनला एक गृहस्थ गाडीत चढले. ते नानांच्या समोर बसले. त्यांचे लक्ष नानांच्या गळ्यातील माळांकडे होते. त्या माळा सुटल्या होत्या. पुन्हा गुंफून घ्यायच्या होत्या. नानांनी आपल्याला काही हवे आहे का? असे विचारताच, ‘मला तुझे घड्याळ व गळ्यातील माळा हव्या आहेत’ असे सांगितले. नानांनी ही आपली सत्वपरीक्षा आहे हे समजून चटकन सर्व काढून दिले. म्हातारे बाबा मुंब्रा स्टेशनवर उतरून गेले. नाना रात्री कामावरून घरी आले. नानींनी गळ्यातील माळांविषयी विचारले तेव्हा नानांनी सर्व सांगून टाकले.
- Post author:vinay samant
- Post published:April 22, 2017
- Post category:अनुभव
- Post comments:0 Comments