-
समाजकार्य
April 22, 2017सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था अनेक समाजोपयोगी ऊपक्रम राबवतच असते. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात संस्थेने अमुक रकमेचा धनादेश आसाम मधील दूर्गम भागात काम करणा-या वनवासी कल्याण आश्रमाला दिला. सदरील उपक्रमाला लाभलेले हे पत्र..
-
यात्रा..
April 22, 2017मठातील सेवेक-यांची अक्कलकोट, गाणगापूर अशी यात्रा झाली. ही स्थळे दत्तसंप्रदायातील शक्तिपिठे समजली जातात. इथे जाणा-या भक्तांना अलौकीक आनंद मिळतो.
-
महाशिवरात्र!
April 22, 2017आज २३/३/२०१६ रोजी मठात महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला. शंकराच्या पिंडीला दहिभात लेपन करून सामुदाईक शिवस्तुती वाचन करण्यात आले. नंतर तो दहिभात प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात आला..
-
मांदयाळी
April 22, 2017आज २३/३/२०१६ रोजी मठात मांदियाळि चा कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रमास ३००भक्तांनी ऊपस्थिती दर्शवली. सकाळी श्रींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ११:३० वाजता महाप्रसाद दाखवण्यात आला.
प्रत्यक्ष भगवान "श्री स्वामी समर्थ" खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते आहेत. श्री स्वामी समर्थ व श्रीपाद श्री वल्लभ यांनी ब्र.भू.प.पू. श्री. पिठले महाराज यांच्या कडून अनेक दीर्घ उपासना करवून घेऊन त्यांचे जीवन श्री. स्वामी समर्थमय बनविले. श्री. पिठले महाराजांनी ब्र.भू.प.पू. श्री. मोरेदादा यांना या सेवा मार्गाच्या संस्थापनार्थ तयार केले.
प.पू. मोरे दादांनी जीवनभर गांजलेल्या समाजाची संकटे , व्याधी , पीडा , निवारण करून, त्यांना मानसिक स्थैर्य मिळवून दिले आहे. अध्यात्मिक प्रगतीमध्येच खुंटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची अध्यात्मिक प्रगती सुकर करून दिली. अशा तऱ्हेने त्यांनी सामाजिक , अर्थी , भौतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात प्रभावी कार्य केले. समाजात धैर्य , उत्साह , नवंचैतन्य आत्मशक्ती वाढवून तेज निर्माण केले. कार्यप्रवृत्त केले. हे कार्य भविष्याती अनंत अविरत चालूच रहावे ह्यासाठी त्र्यंबकेश्वर-नाशीक येथे "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपिठाची" स्थापना केली.
ह.भ.ब्र.भू.प.पू. विठ्ठल शंकर तथा नाना वालावलकर यांना डोंबिवलीत असताना मोरे दादांचे मार्गदर्शन लाभले. लहानपणापासूनच स्वामीस्वरूपी विलीन असलेल्या सद्गुरू नानांचा अध्यत्मिक मार्ग श्री मोरेदादांच्या मार्गदर्शनामुळे अधिक उन्नत झाला. श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेने व श्री मोरेदादांच्या मार्गदर्शनानुसार प.पू. नानांनी आयुष्यभर अनेक पिडीतांना मार्गदर्शन केले व स्वामी सेवेच्या अविरत प्रवाहात सामील करून घेतले. संस्थारूपाने हेच कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प.पू. नाना वालावलकर व सेवेक-यांनी "सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था, डोंबिवली" या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. श्री स्वामी समर्थांच्या अखंड कृपेने सद्गुरू नानांचे विनामूल्य मार्गदर्शन व सेवेकरी घडवण्याचे कार्य आजही सखाराम कॉम्प्लेक्स स्थित मठात अविरत चालू आहे.

जगदिश ढोबळे, अध्यक्ष

प्रदिप चव्हाण, ऊपाध्यक्ष

संतोष कुशे, चिटणीस

सुनिल हरिश्चंद्रकर, सहचिटणीस

निलेश वडके, खजिनदार

शंकर घोसाळकर, सदस्य

सौ दिपा परब, सदस्या

सौ अलका यादव, सदस्या

सौ अलका अणावकर, सदस्या
विवीध ऊपक्रमांची क्षणचित्रे






मठात साजरे होणारे उत्सव
- गुढी पाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा
- श्री स्वामी जयंती : चैत्र शुद्ध द्वितीया
- ब्र. प. पू. श्री मोरेदादा जयंती : वैशाख कृष्ण दशमी
- श्री गुरु पौर्णिमा : आषाढ पौर्णिमा
- श्रावण महिना विशेष सेवा : श्रावण शु. १ ते श्रावण कृ. ३०
- पिठोरी अमावस्या : श्रावण अमावस्या
- नवरात्रौत्सव : अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी
- श्री गायत्री माता उत्सव : अश्विन शुद्ध नवमी
- श्री काळभैरव जयंती : कार्तिक कृष्ण सप्तमी
- नामसप्ताह : कार्तिक कृष्ण चतुर्दशी ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
- श्री दत्तात्रेय जयंती : मार्गशीर्ष पौर्णिमा
- महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशी
- मांदियाळी : महाशिवरात्रीच्या जवळचा रविवार
दैनंदीन कार्यक्रम
- सकाळी ०८:०० वाजता : भूपाळी व आरती
- सकाळी १०:३० वाजता : नैवेद्य आरती
- सायंकाळी ०७:०० वाजता : महाआरती
- सायंकाळी ०८:०० वाजता : सामुदाईक जप
*गुरूवारी सायंकाळी ०८:३० वाजता : सामुदाईक जप
आपण सेवेकरीही आपल्याला आलेले नानांचे अथवा मठातील अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करू शकता. जसे व्हाट्सऍपवर आपण पोस्ट टाकतो तसेच हे अगदी सोपे आहे. सेवेकरी म्हणून नोंद करा व आपले अनुभव सर्वांना कळवा! स्वमीधर्माची पताका सर्वदूर पोचवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ!
भाविकांकडून आलेल्या देणगीतूनच संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. ज्या भाविकांना ह्या कार्यात हातभार लावायचा असेल त्यांनी आपले धनादेश अथवा डिमांड ड्राप्ट सद््गुरू श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था या नावाने खालील पत्त्यावर पाठवावेत :
सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था,
नाना महाराज सोसायटि,
हिरा नागो जोशी मार्ग,
कोपर क्रॉस रोड,
डोंबिवली (प) - 421202
अथवा खालील बँक खात्यावर RTGS/NEFT करावेत व संस्थेला त्या बाबत कळवावे हि नम्र विनंती.
Bank of Baroda : 27870100001047,
IFSC Code : BARB0DOMWES
सद्गुरू श्री नाना महाराज वालावलकर
सद्गुरू नानांचे बालपण एका शेतकरी कुटुंबात सामान्य स्थितीत व्यतीत झाले. सातव्या-आठव्या वर्षापासून माळावर गुरे राखण्याचे काम त्यांना करावे लागे. एकदा असेच गुरे राखण्यात दंग असलेल्या नानांना संध्याकाळ झाली, दिवस मावळला याची शुध्द राहिली नाही. त्यावेळी एक म्हातारा माणूस हातात दंड, कमंडलू, पायात खडावा, उंच धिप्पाड उग्र चेह-याच्या माणसाने नानांना घरी जायला उशीर होतोय असे सांगून दरडावले आणि ‘‘श्री स्वामी समर्थ’’ असे नामस्मरण करण्यास सांगितले व तो निघून गेला. घरी आल्यावर त्यांनी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. त्यानंतरही एकदोन वेळा तोच म्हातारा नानांना रानात भेटला. परंतु त्यावेळेस ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे कोण याचा बोध त्यांना झाला नाही म्हणून ते "सद्गुरु.. सद्गुरु.." असे नामस्मरण करू लागले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची कृपा नानांवर बालपणीच झाली, परंतु बालबुध्दीमुळेच त्यांना त्याचे आकलन झाले नाही. (श्री नानांचे संक्षीप्त चरीत्र >>>)